महाराष्ट्रजळगावताज्या बातम्याधर्मसंस्था
वडणे येथे महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन
धुळे |
तालुक्यातील वडणे येथे महर्षी वाल्मिक ऋषी जयंती निमित्त कोळी समाज व ग्रामस्थांच्या वतीने महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
येथील ग्रामपंचायत कार्यालय आवारात समस्त कोळी समाज व ग्रामस्थांच्या वतीने महर्षी वाल्मीक ऋषी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी समाजाचे समाजाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या जीवनाबद्दल माहिती देण्यात आली.
याप्रसंगी अध्यक्ष मनोहर कोळी, राहुल शिंदे, पुंडलिक कोळी, भैया शिंदे, सचिन शिंदे, महेंद्र कोळी, दीपक कोळी, प्रशांत कोळी, राहुल कोळी,पिंटू दादा, प्रमोद अमृतकर, भावेश पाटील यांची उपस्थिती होती.