ताज्या बातम्या
पाचोरा शहरातील तरुणांचा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश
पाचोरा |
आगामी निवडणुकीआधी मतदारसंघातून वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश होत आहेत. यामध्ये पाचोरा शहरातील तरूणांनी आज प्रवेश घेतला. या सर्वांचे वैशाली सुर्यवंशी यांनी स्वागत केले.
या प्रवेश सोहळ्याला वैशाली सुर्यवंशी यांच्यासह उध्दव मराठे, अॅड. अभय पाटील, संदीप जैन, बंटी हटकर, मनोज चौधरी, हरीश देवरे, निखील सोनवणे,तुषार जगताप यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.