ताज्या बातम्या
रेमंड कंपनीतील बडतर्फ कामगारांच्या आंदोलनाला रोहिणी खडसे यांचा पाठिंबा.
जळगाव |
रेमंड लिमिटेड कंपनीतील २४ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून या कर्मचाऱ्यांनी आपल्याला पुन्हा सेवेत घ्यावे या मागणीकरिता धरणे आंदोलन सुरू आहे. कर्मचारी गेल्या अठरा महिन्यांपासून कामावरून कमी केल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आले असून कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.तातडीने या प्रश्नात लक्ष घालून कामगारांना न्याय मिळवून द्यायची मागणी त्यांनी केली.तसेच कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणाला अडचणी निर्माण होत आहेत तरी रेमंड प्रशासनाने या त्वरित पुर्ववत कामावर घ्यावे, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली.
यावेळी आंदोलन स्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा रोहिणी खडसे यांनी दर्शविला.