महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: अमोल जावळे यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ फैजपूर येथून
फैजपूर |
रावेर विधानसभा क्षेत्रातील भाजपा महायुतीचे तरुण उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ 4 नोव्हेंबर 2024 रोजी फैजपूर येथील श्री खंडोबा महाराज देवस्थान, फैजपूर या ऐतिहासिक ठिकाणावर होणार आहे. प्रचाराची सुरुवात सकाळी 9:30 वाजता केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री ना. श्रीमती रक्षाताई खडसे, राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन, आणि पाच लाडक्या बहिणींच्या प्रमुख उपस्थितीत होईल. या उद्घाटनानंतर, फैजपूर शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा तपशील:
स्थळ: श्री खंडोबा महाराज देवस्थान, फैजपूर
वेळ: सकाळी 9:30 वाजता
विशेष उपस्थिती: रक्षाताई खडसे (केंद्रीय मंत्री), गिरीशभाऊ महाजन (राज्य मंत्री)
उद्घाटनानंतर: फैजपूर शहरात प्रचार रॅली
रावेर विधानसभा क्षेत्रातील भाजपा महायुतीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांना या ऐतिहासिक क्षणी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.