जागतिक मराठी रंगभूमी दिन जळगावमध्ये मोठ्या उत्साहात साजरा
जळगाव |
मराठी रंगभूमीच्या समृद्ध स्मरण म्हणून जागतिक मराठी रंगभूमी दिन जळगावमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बालगंधर्व खुले नाट्यगृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेच्या आयोजनात ज्येष्ठ रंगकर्मीच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील व अरुण सानप यांच्या हस्ते नटराज पूजनाने झाली. बालरंगभूमी परिषदेचे प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अमोल ठाकूर, सचिन महाजन, दर्शन गुजराथी, मोहित पाटील आदी कलावंतांनी पारंपरिक गण आणि नांदी सादर केली.
कार्यक्रमास नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळाच्या सदस्या गीतांजली ठाकरे, प्रमुख कार्यवाह अॅड. पद्मनाभ देशपांडे, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. शमा सराफ, कार्यकारिणी सदस्य सुबोध सराफ, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, उपाध्यक्ष अमोल ठाकूर, हनुमान सुरवसे, सचिन महाजन, आकाश बाविस्कर, सोशल मिडीया प्रमुख मोहित पाटील आदी मान्यवरांसह स्थानिक रंगकर्मी उपस्थित होते.