संस्थाजळगावताज्या बातम्याधर्ममहाराष्ट्रराजकारण

डॉ अश्विन सोनवणे यांचा नवसाचा गणपतीचे दर्शन घेत प्रचाराचा शुभारंभ

शहरात विविध भागात प्रचार

जळगाव |
जळगाव शहर विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार डॉ अश्विन सोनवणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी दि.६ नोव्हेंबर रोजी करण्यात आला.
नवसाचा गणपती देवस्थानला श्रीफळ अर्पण करुन प्रचाराला सूरवात झाली.

डॉ अश्विन सोनवणे यांच्या प्रचार फेऱ्यांना प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी त्यांचे उत्साहात स्वागत होत आहे. विविध परीसरात हेच चित्र दिसून आले.
विविध भागांमध्ये अश्विन सोनवणे यांची प्रचार रॅली निघाली. ठिकठिकाणी औक्षण करून तसेच ढोल ताशांच्या गजरात पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.
डॉ अश्विन सोनवणे यांनी नागरिकांशी संवाद विकासाची ग्वाही दिली.

या भागात झाला प्रचार दौरा पुढील प्रमाणे –
दुध फेडरेशन,राज मालती नगर,
सत्यम पार्कभारत नगर,इंद्रप्रस्थ नगर,दांडेकर नगर, सिटी कॉलनी (खडके चाळ),सिद्धी विनायक पार्क (हरी ओम नगर), लक्ष्मी नगर,गेंदालाल मिल,मौलनी बाबा दर्गा,काळे नगर,लाकूड पेठ, हमाल वाडा,जाफर खान चौक (छ. शिवाजी नगर),छत्रपती शिवाजी नगर चौक,बोहरा मस्जिद,नवीन हुडको, उमर कॉलनी, किस्तीया पार्क (ए.बी. कॉलनी), उस्मानिया पार्क प्रजापत नगर,राज मालती नगर,सिकवाल नगर या भागात प्रचार करण्यात आला.
शहरातील कार्यकर्ते आणि नागरिकांनी सहभागी झाल्याचे दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button