राजकारणजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुक्ताईनगर मतदारसंघातील निराशाजनक चित्र बदलवण्यासाठी रोहिणी खडसेंना निवडून द्या -शरद पवार

वाटेल ते करू मात्र घटना बदल करू देणार नाही - शरद पवार

मुक्ताईनगर|

विधानसभा निवडणुक प्रचारसभा जोरात वारे वाहत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार अॅड. रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रिय कृषी मंत्री खा . शरदचंद्र पवार यांची जाहीर सभा मुक्ताईनगर येथे संपन्न झाली. यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, आ शिरीष दादा चौधरी, शिवसेना उबाठा संपर्क प्रमुख परब, राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल, माजी आमदार अरुण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटिल, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार, डॉ जगदीश पाटील, महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगरच्या उमेदवार अॅड. रोहिणी खडसे, भुसावळचे उमेदवार डॉ राजेश मानवतकर, रावेरचे उमेदवार अॅड. धनंजय चौधरी, आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी नेते उपस्थित होते.
यावेळी रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना, अॅड. रोहिणी खडसे या गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील जनतेच्या संपर्कात आहेत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले त्यांचा विजय निश्चित असल्याचे सांगुन अॅड. रोहिणी खडसे, डॉ. राजेश मानवतकर, अॅड. धनंजय चौधरी यांना विजयी करण्याचे उपस्थितांना आवाहन केले

यावेळी मार्गदर्शन करताना आ. एकनाथराव खडसे यांनी महायुतीच्या काळात महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले, महागाई वाढली, तरुणांना रोजगार देणारे उद्योग इतर राज्यात पळवले गेले शेतकऱ्यांच्य शेतमालाला भाव नाही हे चित्र बदलण्यासाठी महविकास आघाडीचे सरकार आणण्याचे त्यांनी जनतेला आवाहन केले मुक्ताईनगर मतदारसंघ विकासात मागे पडला असून, मतदारसंघांत गुंडगिरी वाढली असून जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे हे सर्व थांबवण्यासाठी उच्चशिक्षित असलेल्या अॅड. रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे उपस्थितांना आवाहन केले
यावेळी मार्गदर्शन करताना शरदचंद्र पवार म्हणाले की, “महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करण्याचा विचार आम्ही करत आहोत आणि हे तुमच्या शिवाय शक्य नाही. नरेंद्र मोदी हे ४०० खासदार हवे तसे सांगत होते. तेवढे लागत नाही पण लोकांना शंका आली. यात काही काळबेरं दिसत आहे. मात्र ४०० जागा जोपर्यंत मिळत नाही. तोपर्यंत घटना बदलता येणार नाही अशी माहिती त्यांच्याच लोकांनी सांगितली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेत बदल करण्याचं यांच्या मनात पाप होतं. याबाबत लोकांमध्ये जागृती करण्यात आली. त्यासाठी सर्व एकत्र आले. इंडिया नावाची आघाडी काढली. सर्वांना एकत्र केलं, तुम्ही साथ दिली राज्यात एकतीस खासदार निवडून आले वाटेल ते करू मात्र घटना बदल करू देणार नाही,” असं शरद पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button