जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण
राज्य जलतरण स्पर्धेत महावीरसिंग पाटील याला रौप्य पदक प्राप्त
सेंट जोसेफ हायस्कूलचा जलतरणपटू महाविरसिंग पाटील यांने रौप्य पदकाची कमाई
जळगांव|
शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे झालेल्या राज्य शालेय जलतरण स्पर्धेत ब्रेस्ट स्ट्रोक या क्रीडा प्रकारात जळगांव येथील सेंट जोसेफ हायस्कूलचा जलतरणपटू महाविरसिंग पाटील यांने रौप्य पदकाची कमाई केली.
महाविरसिंगने १४ वर्षे वयोगटात १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक या क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकविले. राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत जळगांव जिल्हयातील आता पर्यंत पहिले पदक मिळाले आहे. त्याला प्रशिक्षक सागर सोनवणे यांचे मार्गदर्शक लाभले. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे सर्वदूर कौतुक होत आहे.