मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर
जळगांव|
लोकशाहीचा उत्सव असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न तर केलेच जात आहे. मात्र, आता सोशल मीडियावरुनदेखील मतदारांना मतदान करण्यासाठी गंमतीशीर मिम्स तयार करुन, व्हायरल केले जात आहेत.
विशेष म्हणजे नवीन मतदारांना मिम्सव्दारे मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. कारण, तरुणाई ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टीव्ह आहे. त्यामुळे सोशल मीडियावरुन मतदानासाठी केलेले आवाहन थेट तरुणाईपर्यंत पोहचत आहे.
इन्स्टाग्राम, फेसबूक, एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही गंमतीशीर मिम्स व रिल्स व्हायरल होत आहेत.हर्षल सोनार यांच्या संकल्पनेतून मराठी व हिंदी चित्रपटातील गाजलेल्या डॉयलॉगच्या माध्यमातून ‘व्होटकर महाराष्ट्र’ असे आवाहन केले जात आहे. व्हॉट्सअप, फेसबुकसह अन्य सोशल माध्यमात या मिम्स्ला तुफान प्रसिद्धी मिळते आहे.