जळगावताज्या बातम्याराजकारण
जळगाव शहराच्या खड्डेमय रस्त्यांवरून आमदार राजूमामा भोळे यांनी प्रशासनाला विचारणा.
जळगाव |
शहरातील रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झालेली असून शहरातील विविध मुख्य चौकांसह अनेक भागात पावसामुळे आणखी दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे जनतेच्या मनात रोष असून शेकडो कोटींची कामे पूर्ण झाली असतांना जे रस्ते खराब झालेत त्यांच्या दुरूस्तीची जबाबदारी ही कुणाची ? अशी विचारणा त्यांनी केली. डीपीडीसीच्या बैठकीत आमदार राजूमामा भोळे यांनी आक्रमक भूमिका घेत आयुक्तांना धारेवर धरले. याबाबत आ. राजूमामा भोळे यांनी जळगाव शहराच्या दुरावस्थेबाबत भूमिका मांडून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.