जळगाव शहरातून राजूमामा भोळे विजयी
राजूमामा भोळे यांना एकूण १ लाख ५० हजार १९८ मते
जळगाव ।
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला असून जळगाव जळगाव शहर मतदार संघात भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांनी ८७ हजार ४७६ मतांनी आघाडी घेत विजय मिळविला आहे.
जळगाव विधानसभा मतदारसंघात यंदा आमदार राजूमामा भोळे यांच्या विरूध्द लढण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक होते. भाजपमधून बंडखोरी करत माजी उपमहापौर डॉ. अश्वीन सोनवणे आणि माजी नगरसेवक मयूर कापसे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. तर दुसरीकडे शिवसेना-उबाठातून माजी महापौर जयश्री महाजन यांना तिकिट मिळाल्याने बंडखोरी करत माजी उपमहापौर कुलभूषण पाटील हे देखील मैदानात उतरल्यामुळे येथे बहुरंगी लढत झाली.
दरम्यान २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यांनतर आज विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला, यात जळगाव शहरातून राजूमामा भोळे यांनी विजय मिळविला. राजूमामा भोळे यांना एकूण १ लाख ५० हजार १९८ मते मिळाली. तर महायुतीच्या उमेदवार जयश्री महाजन यांना ७२ हजार ७२२ मते मिळाली.