करिअरजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र
एमपीएससी’च्या वेळापत्रकातील परीक्षा प्रलंबितच !
मुंबई |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) स्पर्धा परीक्षार्थीना परीक्षांची तयारी योग्यरीतीने करता यावी, परीक्षा नेमक्या कधी होणार, याचा अंदाज यावा म्हणून दरवर्षी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. २०२४च्या संभाव्य वेळापत्रकामध्ये आयोगाने १६ परीक्षांचा तपशील जाहीर केला होता. यापैकी अद्याप ११ परीक्षा प्रलंबित असल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या २०२५च्या संभाव्य वेळापत्रकावरून स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, काही परीक्षा झाल्या, काहींचे निकाल नाहीत, तर काहींचे अभ्यासक्रमही जाहीर व्हायचे आहेत.
प्रलंबित परीक्षांची माहिती व त्यांच्या संभाव्य तारखा देण्यात आल्या आहेत. यावरून २०२४ मध्ये जाहीर झालेल्या जवळपास ११ परीक्षा प्रलंबित असल्याचे दिसून येते.
मागील काही वर्षांपासून ‘एमपीएससी’ कडून परीक्षांच्या वेळापत्रकाचे पालन होत नसल्याची तक्रार असते.