जळगाव |
शहरातील छत्रपती
शिवाजीनगर परिसरातील गौरव नगर येथे एका अपार्टमेंटमध्ये तरुणाने साडीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. २७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
निनाद शरद बोरनारे (वय ३१, रा. समृद्धी अपार्टमेंट, गौरव नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई-वडील, पत्नी, मुलगा, एक भाऊ व बहीण यांच्यासह राहत होता. गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. दरम्यान बुधवारी दि. २७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घरी एकटाच असताना त्याने ने गळफास लावून घेत आत्महत्या केली.
कुटुंबीयांना ही घटना लक्षात येतात त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. प्रसंगी निनाद बोरनारे याने आत्महत्या का केली याचे कारण आजुन समजू शकले नाही ,मात्र कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. जळगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते .
जळगाव तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पुन्हा आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे.