जी. एच. रायसोनी कॉलेज विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आर्यन पार्क येथे ‘फ्रेशर्स पार्टी’
जितेश आहुजा व राणी चौबे हे ठरले “मिस्टर अॅन्ड मिस फ्रेशर”
जळगाव |
शहरालगत असलेल्या आर्यन पार्क रिसोर्ट येथे जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील प्रथम वर्ष एमबीए व बीबीए विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
कॉलेज लाइफमध्ये प्रवेश करताना विद्यार्थी काहीसे गोंधळलेले असतात. या मुलांना कॉलेजची तसंच सीनिअर्सची ओळख व्हावी यासाठी फ्रेशर्स पार्टीचं आयोजन केलं जातं. नवीन विद्यार्थ्यांना मनसोक्त मजा करण्याचं आणि त्यांत सीनिअर्सनीही या कार्यक्रमाच्या आयोजनात हातभार लावत आपल्या वाटची मजा करून घेण्याचं एकमेव निमित्त म्हणजे ही ‘फ्रेशर्स पार्टी’ असते. या अनुषंगाने जी. एच. रायसोनी महाविध्यालयात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आर्यन पार्क रिसोर्ट येथे ‘फ्रेशर्स पार्टी’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विध्यार्थ्यानी डीजेचा ठेका धरत व गेम्स, पेटपूजा आणि बरंच काही करत मिस्टर आणि मिस फ्रेशर या सगळ्यात प्रसिद्ध स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत एमबीए विभागातून जितेश आहुजा, राणी चौबे तसेच बीबीए विभागातून प्रतिक पाटील व फाल्गुनी कांदारी हे मिस्टर अॅन्ड मिस फ्रेशर ठरले तर बेस्ट पर्सनालिटी – पारस सोनी, बेस्ट वॉक – शिवम जाधव, बेस्ट सोलो – अर्पिता दुसेजा, बेस्ट आउटफिट- प्रसन्ना भावसार यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी महाविध्यालयाची शैक्षणिक व उपक्रमाची माहिती देत सांगितले कि मेहनत अन् अभ्यासात सातत्य असेल, तर निश्चित यश मिळतेच तसेच जिद्द, चिकाटी, परिश्रम व जबाबदारी हे गुण अंगी असल्यास विदयार्थ्यांना यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. भविष्यात समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. असा यशाचा कानमंत्र देत त्यांनी विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रायसोनी इस्टीट्युट वर्षभर विविध विध्यार्थीभिमुख उपक्रम राबवीत असल्याचे सांगत आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यामातून विध्यार्थ्यांना सीनिअर्स व शिक्षकवृंद यांच्याशी ओळख होऊन ते आपसूकच महाविद्यालयाच्या वातावरणात आनंदाने रममाण होतील असे म्हटले. यावेळी व्यासपीठावर अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल हे उपस्थित होते.