महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पाऊस सुरू
मुंबई |
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळाचे परिणाम महाराष्ट्रात दिसण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. तसेच राज्यात वाढलेला गारठा कमी झाला आहे. सध्या मुंबई शहरासह उपनगरात सध्या रिमझिम पाऊस कोसळत आहे. तसेच ठाणे, कल्याण, डोंबिवली, विरार, पालघर या ठिकाणीही पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा झाल्याने राज्यात आज सर्वत्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतावर धडकलेल्या चक्रीवादळाचा विपरीत परिणाम महाराष्ट्रात होत आहे. यामुळे राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. मुंबईत आज ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच मुंबईत काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही कोसळत आहे. विशेष म्हणजे मुंबईमध्ये थंडी असताना फेंगल चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा तापमानात वाढ झाली आहे.
अरबी समुद्रामध्ये असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता अधिक असल्याने मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आर्द्रतेतही वाढ झाली आहे. राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट
रत्नागिरी – 5 डिसेंबर
सिंधुदुर्ग – 5 आणि 6 डिसेंबर
पुणे – 5 डिसेंबर
कोल्हापूर – 5, 6, 7 डिसेंबर
सातारा – 5 डिसेंबर
लातूर – 5 डिसेंबर
धाराशिव – 5 डिसेंबर.