हमिदाबाईची कोठी ने जिंकले प्रेक्षकांची मने….
आकाश बाविस्कर यांचा लेखन आणि अभिनयावर विशेष प्रभाव....
जळगांव |
विजयाबाईंनी केलेले ख्यातनाम नाटक स्वतः हमीदाबाईची भूमिका, अशोक सराफ सत्तारच्या भूमिकेमध्ये आणि भारती आचरेकर, नीना कुळकर्णी, नाना पाटेकर सारख्या कलावंतांनी ज्या नाटकामध्ये भूमिका केलेल्या होत्या. आकाश बाविस्कर या संपन्न कलाकाराचे यासाठी हे नाटक त्याने योग्य ठरवले. यामध्ये आकाशने बाजी मारली. हा विषय आजच्या काळातही वादपूर्ण असाच आहे आणि सत्तरच्या दशकात तर अजूनच परिस्थिती गंभीर. तवायफ याचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर या नाटकाचा अभ्यास करणे आवश्यक, बहुतेकांची गल्लत होते ती इथेच. देह विक्रय करणारी आणि गझल, ठुमरी यांची मैफल सजवणारी तवायफ. घरंदाज अदाकारी तवायफ पेश करीत असत आणि त्या मालिकेतील अखेरची ‘हमिदाबाई’ करारीपणे तिच्या कोठीचे जाज्वल्य स्वरूप प्राणपणाने जतन करते, तिच्या मुलीला म्हणजे शब्बोला तिला या कोठीपासून मात्र तिला दूर देवता येत नाही, कारण या धंद्यातील घरंदाजपणा संपून केवळ फिल्मिगाणी, त्यावर नाच
त्या तालावर होणार शरीरविक्रय हे हमीदाबाई तिच्या अंतापर्यंत होऊ देत नाही. भाग्यश्री भालेराव यांनी ‘हमीदाबाई’ संयमाने साकारली, तिचे खाँसाहेबाबरोबर असलेले संबंध तिच्या गायकीमुळे, १७ वर्ष खाँसाहेब हमीदाबाईंशी एकनिष्ठ राहतात आणि नंतर होणारी वाताहत, शब्बोची काळजी हे सर्व या गुणी अभिनेत्रीने समर्थपणे दाखवले सईदा, शब्बो या भूमिका अनुक्रमे विशाखा व गायत्री यांनी उत्तमरीत्या साकारली. सत्तार साकारत असलेल्या आकाश याने भूमिकेचे बेअरिंग शेवटपर्यंत सांभाळले. वैभव बाविस्कर याचा बाहरवालादेखील उल्लेखनीय असा ठरला. लुक्काचे काम ठीक असे होते. मधूनच निलेश भोई यांनी छान भूमिका पार पाडली. तांत्रिक बाजूंमध्ये नेपथ्य प्रभावी, वेशभूषा आणि रंगभूषा विषयाला समरुप अशी होती. योगेश जगन्नाथ यांची प्रकाश योजना प्रसंगानुरुप, दिग्दर्शक म्हणून आकाश बाविस्कर याचा प्रयत्न खूप महत्वपर्ण असा होता . कलरबोव मल्टीपर्पज फाउंडेशन आणि टीम बाविस्कर यांनी रंगभूमीवरील एक वेगळे विषय हाताळून नाटक वेगळ्या उंचीवर नेले आहे.