कोळी क्रिकेट लीगला प्रारंभ….
जळगांव |
कोळी क्रिकेट लीग (पर्व -५) आयोजित टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे १२ते १५ डिसेंबर दरम्यान शिवतीर्थ मैदान येथे डे-नाईट सामन्यांचे आयोजित करण्यात आलेले आहे. त्या अंतर्गत दि.१२ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता उद्घाटन करण्यात आले.
यात दहा संघ लीग पद्धतीने एकमेकांशी झुंजणार आहेत.
या प्रसंगी महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले.
क्रिकेटपटूंना नवं व्यासपीठ मिळावं यासाठी कोळी क्रिकेट लीगची स्पर्धा सुरू झाली आहे. प्रमुख आकर्षण म्हणून टेनिस स्टार दुर्गेश मडवी(मुंबई), विक्की इंगळे (अलिबाग) यांची उपस्थिति होती.
प्रथम सामना पवन इंटरप्रायझेस विरुद्ध या दरम्यान झाला. प्रथम फलंदाजी करत ९११३ किंग यांनी १५३ धावा केल्यात प्रत्युत्तर पवन इंटरप्रायझेस १११ धावा पर्यंत मजल मारता आली. खेळाडूंनी सामान्यत उत्साह निर्माण केला.
दुसरा सामना जय बालाजी विरुद्ध सैंदाणे सुपर किंग यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करत सैंदाणे सुपर किंग संघाने 62 धावा पर्यंत मजल मारली. जय बालजी संघाने भेदक गोलंदाजी करत सामन्यावर पकड मजबूत केली. यात जय बालाजी संघ विजयी ठरला.
तिसरा सामना साईनाथ इंडस्ट्री विरुद्ध चिंतामणी वॉरियर्स या झाला. साईनाथ संघाने ८० धावा केल्यात हे माफक आव्हान चिंतामणी वॉरियर्स यांनी शेवटच्या षटकात पूर्ण करत विजय प्राप्त केला.
चौथा सामना आरुश्री हॉस्पिटल विरुद्ध कोळी ब्लास्टर यांच्या झाला. आरुषी हॉस्पीटल संघ ९ गड्यानी विजयी ठरला.
आजचे सामनावीर – पवन तायडे,राकेश बाविस्कर, स्वप्निल सूर्यवंशी,हेमराज कोळी,मयूर सपकाळे,साहेबराव कोळी,शुभम रायसिंग हे सामनावीर ठरले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आश्विन शंकपाळ, युवराज सोनवणे,प्रदीप सपकाळे,संजय जैतकर,जितेंद्र सोनवणे,ऋषी सोनवणे,धीरज सपकाळे,सागर सपकाळे,संदीप महाले,वरुण बाविस्कर,शुभम तायडे,जीवन तायडे, रत्नदीप सपकाळे,भूषण कोळी,राजू तायडे यांचे अनमोल सहकार्य लाभले.