कोळी क्रिकेट लीग “9113 किंग्स” संघ ठरला विजयी
दुसऱ्या स्थानी रुबाबदार तर तिसऱ्या स्थानी अरुश्री हॉस्पिटल
जळगांव |
कोळी क्रिकेट लीग (पर्व -५) आयोजित टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे १२ते १५ डिसेंबर दरम्यान शिवतीर्थ मैदान येथे डे-नाईट सामन्यांचे आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या अंतर्गत रविवार दि.15 डिसेंबर रोजी अंतिम सामना किंग्स विरुद्ध रुबाबदार यांच्यात झाला. रुबाबदार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत दहा षटकात 51 धावा केल्या प्रत्यत्तर 9113 किंग्स 4 गडी राखून विजयी ठरले.
कार्यक्रमाप्रसंगी जि.प सदस्य प्रताब गुलाबराव पाटील,नगरसेवक मुकुंदा सोनवणे,डॉ. परीक्षित बाविस्कर,जयदीप सोनवणे,नरेंद्र सोनवणे,पप्पू तायडे, नगरसेवक भरत सपकाळे यांची उपस्थिती लाभली.
तिसऱ्या स्थानासाठी सैंदाणे सुपर किंग्स विरुद्ध अरुश्री हॉस्पिटल यांच्यात झाला. यात अरुषी हॉस्पिटल 7 गडी राखून विजयी ठरले.
विजेत्या संघाला चषक आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आल्यात.
आजचे समानावीर -जितू कोळी,किरण कोळी,गुणवंत कोळी,मोहित सपकाळे,दीपक सोनवणे, बेस्ट बॉलर -हर्षल सैंदाणे, बेस्ट प्लेअर शुभम कोळी हे ठरले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आश्विन शंकपाळ, युवराज सोनवणे,प्रदीप सपकाळे,संजय जैतकर,जितेंद्र सोनवणे,ऋषी सोनवणे,धीरज सपकाळे,सागर सपकाळे,संदीप महाले,वरुण बाविस्कर,शुभम तायडे,जीवन तायडे, रत्नदीप सपकाळे,भूषण कोळी,राजू तायडे यांचे अनमोल सहकार्य लाभले.