धर्म म्हणजे आपले आपले कर्तव्य आहे – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ
जळगाव |
देश कोणी नेता, अधिकारी, कोणी एक व्यक्ती चालवत नसतो, तर देश हा समाज चालवत असतो. त्यामुळे देशाच्या प्रती आपले कर्तव्य आपण ओळखले पाहिजे, हल्ली धर्म शब्दाचा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावला जात आहे. त्यामुळे “धर्म म्हणजे आपले आपले कर्तव्य आहे. कुटुंब, समाज आणि देशाला प्रगतीकडे नेणारे” असे प्रतिपादन वक्ते ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी जाहीर व्याख्यानात केले.
भारत विकास परिषद व भारतीय मंच जळगाव शाखा देवगिरी प्रांत यांच्यातर्फे ‘राष्ट्र का उत्थान हमारा दायित्वा’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. व्याख्यान शनिवार दि. २७ जुलै रोजी श्री छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे सायंकाळी झाले. व्यासपीठावर प्रमुख
वक्ते म्हणून पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. किशोर पाटील, भारत विकास परिषद शाखा अध्यक्ष विशाल चोरडिया, क्षेत्रीय प्रकल्प सचिव तुषार तोतला, भारतीय विचार मंचचे प्रमुख संजय हांडे आमदार राजूमामा भोळे उपस्थित होते. मान्यवरांचा हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सुयोग गुरव यांनी ‘वंदे मातरम्’ गीत गाऊन झाली. पुढे बोलताना पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ म्हणाले की, आजच्या पिढीला पाश्चिमात्य संस्कृतीचे जास्त अनुकरण का करतात, याला आपणच जबाबदार आहोत. आपली हजारो वर्षांपूर्वीची संस्कृती, ऋषी-मुनी यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान आणि संस्कृती ही वैज्ञानिक पद्धतीची आहे. पांचातत्व्याचे याचे महत्त्व विषद करीत विविध उदाहरणे देत स्पष्ट केले. आपल्या जीवनात शब्द हा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे चुकीच्या शब्द प्रयोगाने कुणाला दुखी करू नका, तसेच भारतीय संस्कृती वैवाहिक संस्कृती व सनातन धर्म पुढील काळात किती महत्त्वपूर्ण आहे, हे त्यांन व्याख्यानातून मांडणी केली.