व्यापाराचे पैसे लुटल्याप्रकरणी सूत्रधाराला अटक
जळगाव एलसीबीची मोठी कामगिरी, धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्यावर पडला होता दरोडा
जळगाव |
धरणगाव तालुक्यातील
मुसळी फाट्याजवळील फेब्रुवारी महिन्यात १ कोटी ६० लाख रुपयांच्या दरोड्याप्रकरणातील टिल्लूसिंग राजूसिंग टाक वय ३२ हा प्रमुख सुत्रधाराला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी गुजरात राज्यातील सुरत येथील परसबाग परिसरातून पायी चालत असताना शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
धरणगाव येथील ‘दुर्गेश इम्पेक्स’ या जिनिंग मीलचे शेतकऱ्यांच्या कापसाचे पेमेंट करण्यासाठी जळगावातील बँकेतून रोकड घेऊन जाणाऱ्या वाहनाला समोरून धडक देऊन वाहनातील अकाऊंटंट दीपक महाजन, कर्मचारी योगेश पाटील व चालक उमेश पाटील या तिघांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून १ कोटी ६० लाख रुपयांची रोकड लुटण्याची घटना १७ फेब्रुवारी २०२४ रोजी महामार्गावर मुसळी फाट्यावर झाली होती. या प्रकरणात चार संशयितांना पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेऊन अटक केली होती. परंतु प्रमुख आरोपी टिल्लूसिंग राजूसिंग टाक (शिकलकर) हा दहा महिन्यांपासून फरार होता.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना शिकलकर टोळीतील प्रमुख हा सुरत येथे असल्याचे माहिती तेथील पोलीस अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी एलसीबीच्या पथकाला कळविले. एलसीबीचे उप पोलीस निरीक्षक गणेश वाघमारे, हे.कॉ. प्रमोद लाडवंजारी, नंदलाल पाटील, कीरण धनगर, महेश महाजन, नितीन बाविस्कर, भगवान पाटील, प्रदिप सपकाळे, महेश सोमवंशी, प्रमोद ठाकुर, या पथकाने सुरत येथे जाऊन परसबाग परिसरातून पायी चालत असलेल्या टिल्लूसिंग राजूसिंग टाक ३२ वर्षीय मुख्य सूत्रधाराला शिताफिने ताब्यात घेत अटक केली आहे.

त्याने गुन्हा केल्याची पोलिसांना कबुली दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर या गुन्ह्याचा तपास उप पोलीस निरीक्षक गणेश वाघमारे करीत आहे.