ताज्या बातम्या

गायन, वादन आणि नाट्यशास्त्रासाठी प्रवेशप्रक्रिया सुरु

जळगाव ।
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कला व मानव्यविद्या प्रशाळेअंतर्गत संगीत विभागात वर्ष २०२४- २५ साठी पदविका व एम.ए. गायन, वादन (तबला) तसेच नाट्यशास्त्र या विषयासाठी प्रथम वर्षासाठी प्रवेश देणे सुरु आहेत. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून विविध व्यावसायिक संधी या अभ्यासक्रमामुळे मिळू शकतात. संगीत विभागात पदविका व पदव्युत्तर एम.ए. साठी गायन, वादन (तबला) व नाट्यशास्त्र विषयात प्रवेश सुरू असून इच्छुक विद्यार्थ्यांनी ३१ जुलै पर्यंत प्रवेश घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती साठी डॉ. मनोज गुरव (९४२३१४६६१८) व तेजस मराठे (९२२६२५७०५२) अशी माहिती प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा. राम भावसार यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button