शिरपूर येथे एसीबीची धडक कारवाई
शिरपूर |
वीज खांबावरील वायर
दुसरीकडे जोडून देण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती ४०० रुपयांची लाच स्वीकारताना वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र वसंत धोबी (वय ३३, रा. ह. मु. महाराजा अग्रसेन नगर, शिरपूर, मूळ रा.लोहटार, ता.पाचोरा) यास अटक करण्यात आली.
३५ वर्षीय तक्रारदाराच्या घराचे बांधकाम सुरू असून त्यांच्या घराच्या वीजपुरवठ्याच्या वायरचा अडथळा होत असल्याने ही वायर दुसऱ्या खांबावर जोडून दिल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे तंत्रज्ञ धोबी यांनी ५५० रुपये लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने गुरुवार, ९ रोजी तक्रार नोंदवली. पडताळणीत तक्रारदाराने आरोपीने तडजोडीअंती ४०० रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यानंतर शुक्रवारी सापळा रचण्यात आला. लाच स्वीकारताच आरोपीला अटक करण्यात आली. सापळा पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार कदम, मकरंद पाटील, प्रवीण पाटील आदींच्या पथकाने यशस्वी केला.