आदिवासी दिनानिमित्त उपस्थित राहण्याचे आवाहन.
मनवेल ता. यावल |
येत्या ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदीवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी आदिवासी समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोळी समाज जितेद्र सपकाळे यांनी यावल येथे आयोजित केलेल्या तालुका बैठकीत केले.
यावल तालुकात आदीवासी टोकरे कोळी सामाज बांधवाची बैठक जिनिंग प्रेस संघाच्या कार्यलयात आयोजित करण्यात आली होती. ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदीवासी दिन साजरा करण्या बाबत चर्चा करण्यात आली.
यावल जिनींग प्रेस सभागृहा पासून ते धनश्री टाँकीज पर्यत सजीव देखावा काढुन आदीवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा विषय सर्वाचा मते मंजूर करुन उत्सव समितीची कार्यकरीण नुकतीच जाहिर करण्यात आली.
अध्यक्षपदी शिरसाड येथील माजी सरसरपंच प्रविण तुकाराम सोनवणे, उपाध्यक्षपदी जितू कोळी (भालोद), विजय मोरे साकरी, खजिनदार खेमचंद कोळी पाडळसा, प्रसिद्ध प्रमुख पदी गोकुळ कोळी (मनवेल), तर सदस्यपदी कीरण कोळी दहिगाव), धनराज कोळी (अट्रावल), संदिप सोनवणे (दुसखेडा), राहुल तायडे बामणोद, भरत कोळी (यावल), रोहिदास सपकाळे (पिप्री), पदमाकर कोळी डो. कठोरा, भिकन सपकाळे अंजाळे, नामदेव कोळी, प्रमोद सोनवणे कीरण कोळी पाडळसा सदस्यपदी निवड करण्यात आली.
आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी आपल्या गावातील सर्व समाज बांधव, विविध पदावर असलेल्या महिलासह प्रत्येक गावातील सरपंच व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने आदिवासी बांधवाना कार्यक्रम उपस्थिती द्यावी असे आवाहन जितेद्र सपकाळे यांनी मार्गेदशन केले.
यावेळी नंदु सोनवणे, बबलु कोळी, , प्रमोद सोनवणे, सागर कोळी, भरत पाटील भुसावळ, संजय नन्नवरे यावल, गोकुळ कोळी, दिपक तायडे अट्रावल, योगेश कोळी, योगेश कोळी, सह समाज बांधवांनी मार्गेदशन केले.