राज्यस्तर शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेवर “सिद्धिविनायक” विद्यालयचे वर्चस्व
जळगाव |
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर, यांच्या वतीने व महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाच्या तांत्रिक सहकार्याने राज्यस्तर शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा दिनांक 12 ते 16 जानेवारी या कालावधीत पेठ वडगाव तालुका हातकणंगले येथील सह्याद्री एज्युकेशन संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन गुरुकुल विद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आल्या. राज्यस्तर शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेत जळगाव येथील सिद्धिविनायक विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज च्या खेळाडूंनी 14 वर्ष मुले 19 वर्ष मुले व मुलींनी अंतिम सामन्यात विजय प्राप्त करून स्पर्धा विजेतेपद प्राप्त केले आहे.
17 वर्ष वयोगटात मुलांच्या संघाला पुणे विभागाकडून पराभव पत्करावा लागल्याने उपविजेते पदावर सिद्धिविनायक विद्यालयास समाधान मानावे लागले.
सिद्धिविनायक विद्यालयाने मिळवलेल्या या यशाचे जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.
जळगाव जिल्हा आट्यापाट्या संघटना व सिद्धिविनायक फाउंडेशनचे अध्यक्ष आमदार अण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते विजयी संघांतील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
माजी आमदार सौ. लता चंद्रकांत सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रवींद्र नाईक साहेब, भारतीय सॉप्टबॉल महासंघाचे सचिव डॉ. प्रवीण अनावकर, जिल्हा आट्यापाट्या संघटनेचे सचिव डॉ, प्रदीप तळवेलकर, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त श्री. किशोर चौधरी, सिद्धिविनायक फाउंडेशनच्या संचालिका व जळगाव जिल्हा आट्यापाट्या संघटनेच्या कार्याध्यक्ष डॉ. अमृता सोनवणे, राज्य खो-खो संघटनेचे सहसचिव श्री जयांशु पोळ डॉ. गौरव सोनवणे, मुख्याध्यापक श्री. आर. पी. खोडपे, यांनी विजय संघातील खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले.