करिअरजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणसंस्था

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपले शिक्षण आणि व्यक्तिमत्वविकास साधा - आमदार चंद्रकांत सोनवणे

जळगाव |
शहरातील सेंट टेरेसा विद्यालयात जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने ५२ व्या पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातील मान्यवरांनी श्री सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन करून व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

यावेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले की, मोबाईलचा वापर केवळ गरजेसाठीच करावा. त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलला मित्र मानण्याऐवजी आपले खरे मित्र म्हणजे शिक्षक आणि पालक असल्याचे पटवून दिले. विद्यार्थ्यांनीं आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपले शिक्षण आणि व्यक्तिमत्वविकास साधावा, पण मोबाईलचा अतिवापर मात्र टाळावा. “आई-वडील यांची सेवा करा. आपल्या जीवनाचा तेच खरा आधार असून, त्यांच्यासोबतचा स्नेह आणि संवादच आपल्याला खऱ्या यशाकडे घेऊन जाईल.” यावेळी डायटचे प्राचार्य अनिल झोपे, जिल्हा परिषद जळगावचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन परदेशी, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) ई. आर. शेख, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) रागिणी चव्हाण, गट विकास अधिकारी सरला पाटील, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) एन. एफ. चौधरी, जिल्हा शिक्षक सेनेचे नरेंद्र सपकाळे, रविंद्र चव्हाण सर, ज्ञानेश्वर सोनवणे, गट शिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी बी. डी. धाडी, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळचे अध्यक्ष किशोर राजे, सचिव सुनील वानखेडे, उपाध्यक्ष एस. डी. पाटील, सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मिडीयम हायर सेकंडरी स्कुलच्या मुख्याध्यापिका सिस्टर जुलीट, शालेय व्यवस्थापन समिती व कर्मचारी, जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व विद्यालयातील मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी तसेच जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, जळगाव आदींचे या समारंभाला उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button