नोबेल किड्स झोन:एज्युकेशन मॉलचे थाटात उद्घाटन संपन्न

जळगांव|खान्देश लाईव्ह न्यूज|
आज नोबेल किड्स झोन एज्युकेशन मॉल या नवीन दालनाचे उद्घाटन सकाळी थाटात संपन्न झाले.जैन उद्योग समूहाचे मीडिया उपाध्यक्ष अनिल जोशी ,स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन नीरज अग्रवाल यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी डाएटचे निवृत्त प्राचार्य आप्पासाहेब निळकंठ गायकवाड उपस्थित होते. ज्येष्ठ श्रेष्ठ आणि मित्रांच्या मांदियाळीत आजचा दिवस आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला.
नोबेल फाउंडेशनचे विज्ञान क्षेत्रातील कार्य अजून पुढे जाण्यासाठी या दालनाची मदत होणार आहे. नोबेल एज्युकेशन मॉलच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य, पुस्तके ,वैज्ञानिक खेळणी ,लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठीची खेळणी ,यासह शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी एकाच ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. आजच्या या अनमोल दिवशी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर,सर्व मित्रमंडळी व ज्येष्ठांनी आशीर्वाद-शुभेच्छा दिल्या याप्रसंगी बाहेती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल लोहार, सामाजिक कार्यकर्ते सचिन बोरसे, भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी ,सामाजिक कार्यकर्ते एन.टी.पाटील, मान्सून ट्रेडर्स चे अमरसिंग राजपूत, दत्ता पाटील,कबचौ उमविचे वित्त व लेखाधिकारी रवींद्र पाटील,नंदुरबार येथील वनविभागाचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र पाटील, सुप्रीम कंपनीचे विपुल पारेख,पत्रकार चरणसिंग पाटील,अतुल पाटील सर,राजेंद्र पाटील यासह नागरिकांची उपस्थिती होती.