जलजीवन मिशनच्या कामात विलंब, ग्रामस्थांची नाराजी

मुबारकपुर (ता. शहादा)|
तालुक्यातील आडगाव येथील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेले पाणीपुरवठा काम तीन-चार महिन्यांपासून प्रलंबित आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
जलजीवन मिशनचा उद्घाटन राज्यभर मोठ्या धूमधडाक्यात झाला होता, मात्र आडगाव येथील कामावर मात्र बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. ठेकेदाराने स्पष्टपणे सांगितले की, काम वरूनच थांबलेले आहे. यावर ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, याला दोषी कोण ठेकेदार की प्रशासन?
संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन याची पूर्णता करावी. जलजीवन मिशन कार्यान्वयनामध्ये होणाऱ्या या विलंबामुळे होणाऱ्या अडचणींवर प्रशासनाने त्वरित विचार केला पाहिजे, असे मत ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांची मागणी
“योजना लवकर पूर्ण करा, नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जलजीवन मिशन कार्यान्वित करा,” असे ग्रामस्थांचे एकमुखी म्हणणे आहे.