सीयूईटी नोंदणीसाठी ८ फेब्रुवारीपासून मुदतवाढ राष्ट्रीय चाचणी एजन्सीतर्फे जाहीर
जळगाव |
कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्टसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय चाचणी एजन्सीने (एनटीए) कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्टसाठी नोंदणीची तारीख वाढवली आहे. आता उमेदवार ८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करू शकणार आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी exams.nta.ac.in/CUET -PG अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
अर्ज शुल्क सामान्य श्रेणीतील • उमेदवारांसाठी दोन परीक्षांसाठी १४०० रुपये आणि प्रत्येक परीक्षा पेपरसाठी ७०० रुपये असणार आहे. ओबीसी, एनसीएल/सामान्य इडब्ल्यूएस उमेदवारांना दोन परीक्षांसाठी १२०० रुपये आणि प्रत्येक परीक्षा पेपरसाठी ६०० रुपये
असणार आहे. एससी, एसटी, तृतीयपंथी उमेदवारांना दोन परीक्षांसाठी ११०० रुपये आणि ६०० रुपये आहे. पीडब्लूबीडी श्रेणीतील उमेदवारांसाठी प्रत्येक परीक्षा पेपरसाठी १००० रुपये आणि प्रत्येक पेपरसाठी ६०० रुपये असणार आहे. शुल्क भरण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी असणार आहे. दुरुस्ती विंडो १० फेब्रुवारी रोजी उघडणार असून, १२ फेब्रुवारी रोजी बंद होईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. नोंदणीसाठी उमेद्वारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. होम पेजवर उपलब्ध असलेल्या नोंदणी लिंकवर क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना नोंदणी तपशील प्रविष्ट करावे लागतील, एकदा ते पूर्ण झाल्यावर, लॉगिन करा. फॉर्म भरा आणि अर्ज शुल्क भरा. सबमिट वर क्लिक करा आणि पेज डाउनलोड करावे.