करिअरजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीसीए, एमबीए प्रवेश परीक्षेच्या अर्ज नोंदणीस २० मुदतवाढ

जळगाव |
बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस, एमबीए तसेच एमसीए (इंटिग्रेटेड) या अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबवण्यात येणाऱ्या परीक्षेच्या नोंदणी अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी देण्यात आलेली मुदत १० फेब्रुवारी रोजी संपुष्टात आल्याने सीईटी सेलकडून आता नव्याने २० मार्च पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अद्याप अर्ज नोंदणी न
करू शकलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ज्या विद्यार्थ्यांना बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस, एमबीए (इंटिग्रेटेड), एमसीए (इंटिग्रेटेड) या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांना सीईटी प्रबेश परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना दिलेल्या मुदतीत
https://cetcell.maha cet.org/या कार्यालयीन संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज भरावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button