करिअरजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रसंस्था

आकांक्षा म्हेत्रे करणार ट्रॅक सायकलिंग मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व

जळगांव |
सायकलिंग हा खेळ एक फॅशन म्हणून आकांक्षाने सुरूवात केली होती. रोज अतिशय शिस्तबध्द पध्दतीने तीने कठोर मेहनत करून तिचे राष्ट्रीय स्तरावर आपले नाव कोरले. तसेच ७ त ८ जानेवारी दरम्यान दिल्ली येथे झालेल्या ३१व्या एशियन ट्रॅक सायकलिंग निवड चाचणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत तिने भारतीय संघामध्ये स्थान प्राप्त केले.
२१ ते २६ फेब्रवारी २०२५ राजी मलेशिया येथील निलाई येथे ३१व्या एशियन ट्रॅक सायकलिंग चॅमपियनशिप होणार आहे. या स्पर्धेसाठी आकांक्षा म्हेत्रे (बाहेती महाविदयालय) दिल्ली येथून १७ फेब्रुवारीला मलेशियासाठी रवाना झालेली आहे. जळगांवमधील पहिली सायकलपटू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. म्हणून आकांक्षाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
३१व्या एशियन ट्रॅक सायकलिंग स्पर्धेमध्ये एकूण १० देशांचे ८०० ते ९०० खेळाडू आपआपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करण्यार आहे. त्यात भारताकडून आकांक्षा म्हेत्रे सहभाग होणार आहे. तसेच या अगोदर देखील आकांक्षाने ट्रॅक,रोड,माऊंटन बाईक या राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेली आहे. आकांक्षाला प्रशिक्षक सागर सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button