राजकारणक्राईमजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाळधी गावात दगडफेक आणि जाळपोळ

नववर्षाच्या रात्री दोन गट भिडले;गावात संचारबंदी लागू

धरणगाव |
तालुक्यातील पाळधी येथे रात्री उशीरा दोन गटांमधील संघर्ष उफाळून आला. यातून दुकानांची जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे. गावातील वातावरण तणावग्रस्त मात्र नियंत्रणात आहे. दि. ३१ च्या रात्री माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या गावात हा प्रकार घडला.

या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, दि. ३१ च्या रात्री नवीन वर्षाच्या स्वागताची सर्वत्र धामधुम सुरू असतांना धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मात्र दोन गटांमधील संघर्ष उफाळून आला. रात्री दोन गटांमधील संघर्षाने भीषण रूप धारण केले. यातून गावातील चार दुकानांना आग लावण्यात आली. तसेच फलक आणि वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली.

पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाळधी व धरणगावच्या पोलिसांसह दंगल नियंत्रक पथकाने पाळधी येथील जमावाला पांगवले. तसेच अग्नीशामक दलाच्या बंबांनी दुकानांना लावलेली आग नियंत्रणात आणली. दरम्यान, पोलिसांनी दंगलीच्या संदर्भात तात्काळ कृती करत काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. तर याबाबत रात्री उशीरापर्यंत पाळधी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंत्र्यांच्या वाहनांना अडवण्याचा प्रयत्न झालेला होता, अतिशय गंभीर बाब आहे. पोलीस प्रशासनाने देखील यावरती गंभीरतेने दखल घेतलेली आहे.

पाळधी गावात सध्या वातावरण हे पूर्णपणे नियंत्रणात आले. कुणीही समाजमाध्यमांवर या संदर्भात अफवा पसरवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button