जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रसंस्था

माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध धार्मिक आणि समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन

जळगांव | *खान्देश लाईव्ह न्यूज*|
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त विविध धार्मिक आणि समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात मंत्रोच्चारात गायत्री यज्ञ करण्यात आला, तर त्यांच्या दीर्घायुष्यासाठी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये महामृत्युंजयाचा जापही करण्यात आला.

वैद्यकीय महाविद्यालयात गायत्री यज्ञ:
वैद्यकीय महाविद्यालयात रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, सौ. ज्योत्सना भिरूड, राजपुरोहित डी.टी. राव, गोपाळ भोळे, सौ. भोळे यांच्या हस्ते गायत्री यज्ञ करण्यात आला. डॉ. उल्हास पाटील यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त शुद्ध तुपाचे ६५ दीपप्रज्वलन करून महाआरती करण्यात आली. यावेळी हृदयविकार तज्ञ डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्वीकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक आणि रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

शैक्षणिक संस्थांमध्ये महामृत्युंजय मंत्राचा जाप:
डॉ. उल्हास पाटील यांच्या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी गोदावरी फाउंडेशन संचालित विविध शैक्षणिक संस्थांमध्ये महामृत्युंजय मंत्राचा जाप करण्यात आला. गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि गोदावरी आयएमआर महाविद्यालयात संचालक डॉ. प्रशांत वारके आणि प्रा. सौ. नीलिमा वारके यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. याप्रसंगी शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, रजिस्ट्रार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस:
डॉ. उल्हास पाटील यांच्यावर वैद्यकीय शस्त्रक्रिया सुरू असल्याने, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक मान्यवर आणि हितचिंतकांनी रुग्णालयात भेट दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button