पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील शूटिंग खेळातील पदक विजेत्या खेळाडूंचा एकलव्य शूटिंग आकॅडेमी तर्फे आतिषबाजी करत जल्लोष साजरा
जळगाव |
एकलव्य क्रीडा संकुल संचालित एकलव्य शूटिंग आकॅडेमी तर्फे रोजी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतीय नेमबाज मनू भाकर, सरबज्योतसिंग, स्वप्नील कुसाळ यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरी बद्दल आणि त्यांच्या यशाबद्दल एकलव्य शूटिंग अकॅडेमीच्या सर्व खेळाडूंनी भारतीय ध्वज फडकावत, फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. याप्रसंगी एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री. मीनल थोरात, मू. जे. महाविद्यालयाचे प्रा. डॉ. जुगलकिशोर दुबे, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉ. रणजित पाटील, एकलव्य शूटिंग आकॅडेमी चे मुख्य प्रशिक्षक श्री. सागर सोनवणे, एकलव्य बास्केट बॉल अकॅडेमी चे मुख्य प्रशिक्षक श्री. जितेंद्र शिंदे, एकलव्य टेबल टेनिस अकॅडेमी चे मुख्य प्रशिक्षक श्री. विजय विसपुते, एकलव्य बॅडमिंटन अकॅडेमीचे मुख्य प्रशिक्षक श्री. शेखर सोनवणे एकलव्य मल्लखांब अकॅडेमीचे मुख्य प्रशिक्षक श्री. नरेंद्र भोई तसेच एकलव्य क्रीडा संकुलातील विविध क्रीडा प्रकारातील सर्व प्रशिक्षक उपस्थित होते. यावेळी सर्व खेळाडूंनी भारत मातेचा जयघोष करत स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.