जळगावताज्या बातम्याधर्ममहाराष्ट्रसंस्था

धर्म पंथ पार्टी पक्ष जात पात विसरून ‘माणूस’ म्हणून जगा ! -संतोष पावरा

संतोष पावरा यांना 'राज्यस्तरीय आंबेडकरी अस्मिता पुरस्कार' देऊन गौरव

जळगांव|खान्देश लाईव्ह न्यूज|
सामाजिक, साहित्यिक क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ति आणि संस्थाना मागील 18 वर्षीपासून दरवर्षी अप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान जळगांव च्या वतीने यंदाचा 19 वा *राज्यस्तरीय आंबेडकरी अस्मिता पुरस्कार* नंदुरबार जिल्हय़ातील सामाजिक कार्यकर्ते, युवा कवि साहित्यिक संतोष पावरा यांना हा पुरस्कार प्रमुख मान्यवर व आयु. डॉ. पी.आर चौधरी आयु. शरद भालेराव आयु. विठ्ठल आ. भालेराव आदी मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार काल कथित सतीश ओंकार सपकाळे स्मृतिप्रित्यर्थ देण्यात आले होते.
सामाजिक, साहित्यिक क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी व मानवी मूल्यांचे प्रचार-प्रसार करणाऱ्या व्यक्ति आणि संस्थाना मागील 18 वर्षीपासून दरवर्षी भालेराव प्रतिष्ठान ‘आंबेडकरी अस्मिता पुरस्कार’ देऊन गौरव करीत आले आहे. यंदाचा पुरस्कार संतोष पावरा, प्रतिभा शिंदे आणि शाहीर किशोर वाघ आदी मान्यवरांना देण्यात आले. यावेळी आपल्या मनोगतात पावरा म्हणाले, मानवी मूल्यांचे संवर्धन प्रसार प्रसारसाठी धर्म पंथ पार्टी पक्ष जात पात विसरून माणुस म्हणून जगता आले पाहिजे, तेव्हाच मानवता टिकेल.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.पी. आर.चौधरी यांनी न्याय स्वतंत्र समता आणि बंधुत्व मूल्यांचे महत्व पटवून देत मूल्यांची होणारी गळचेपी यावर प्रकाश टाकला. प्रतिभाताई शिंदे, शाहीर किशोर वाघ, आयु. शरद भालेराव आदी मान्यवर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button