भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कार्यशाळा संपन्न

जळगांव |
भारतीय जनता पार्टी संघटन पर्व अभियान उत्तर महारातील जळगांव , धुळे , नंदुरबार जिल्ह्याची विभागीय कार्यशाळा आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संभाजी राजे सभागृहात संपन्न झाली.
यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी यांचेकडून भाजपा सदस्यता अभियान बाबत आढावा घेण्यात येऊन, उत्तर महाराष्ट्रातील पक्षाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील टॉप पाच विधानसभांपैकी जळगाव विधानसभेने पाचवा क्रमांक मिळवील्याबद्दल जळगाव विधानसभा आमदार सुरेश भोळे व महानगर जिल्हाध्यक्ष सौ उज्वला बेंडाळे यांचे सन्मान करण्यात आला. सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदिं च्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी राज्यात 1 कोटी नागरिकांनी भाजपा पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. आगामी काळात दीड कोटी सदस्यसंख्या असलेला राज्यातला सर्वात मोठा पक्ष बनवण्याचे लक्ष्य पार करण्यासाठी मेहनत घेण्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,कार्यकारी अध्यक्ष
रविंद्र चव्हाण यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना आले.
ना.मंत्री, गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, मंत्री, जयकुमार रावल,माजी मंत्री,विजयकुमार गावित,प्रदेश महामंत्री, विजय चौधरी,उत्तर महाराष्ट्र विभाग संघटन मंत्री, रवी अनासपुरे, प्रदेश महामंत्री आमदार, विक्रांत पाटील, प्रदेश महामंत्री, राजेश पांडे, आमदार, राजुमामा भोळे , मंगेश चव्हाण, राजेश पाडवी, अमोल जावळे, अनुप अग्रवाल , राघवेंद्र भदाणे, माजी खासदार सुभाष भामरे, डॉ.उल्हास पाटील, एम के. अण्णा पाटील, चंदूलाल पटेल, डॉ.राधेश्याम चौधरी, उज्वला बेंडाळे, ज्ञानेश्वर पाटील जळकेकर, धुळे महानगर अध्यक्ष गजेंद्र अंबपडकर, धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, डॉ. राजेंद्र फडके, किशोर काळकर, नंदू महाजन, अजय भोळे, दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी, अरविंद देशमुख, महेश जोशी, अमित भाटिया, सचिन पान पाटील, जितेंद्र मराठे, महेश पाटील, मुविकोराज कोल्हे, योगेश पाटील, मनोज बाविस्कर, यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.