सारजमाय ग्राफिक्स तर्फे पुरस्कार वितरित
जळगांव | खान्देश लाईव्ह न्यूज |
समाजाचे आपण देणे लागतो’ या भूमिकेतून जगणाऱ्या रत्नांचा
“सारजामाय ग्राफिक्स पुरस्कार २०२५” सन्मान प्रदान करण्यात आला.
वसुनंदीनी फाउंडेशन जळगावच्या सचिव माधुरी कुळकर्णी यांना सारजामाय ग्राफिक्स तर्फे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्या वर्षभरात आपल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर कार्यक्रमांचे आयोजन करत असतात.त्याच प्रमाणे गोवा येथील कवयित्री शुभांगी गुरव आपल्या लेखणीतून समाजप्रबोधन करत आहेत.त्यांना देखील पुरस्कार जाहीर करण्यात आला.
उषा शिलवंत घोडेस्वार यांना उज्ज्वल व्यसनमुक्ती केंद्र व पुनर्वसन साकोला येथे भंडारा जिल्हयात चालवत आहेत.
संस्थेकडून समाजातील प्रतिष्ठित आणि विविध क्षेत्रात प्रगती करत असताना सोबत सामाजिक बांधिलकी जपत नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार व सन्मान करण्याचे धोरण आहे. हा सन्मान सारजामाय ग्राफिक्स तर्फे करण्यात आला आहे.