ताज्या बातम्याजळगावधर्मराजकारण

उनपदेव येथे भोंगऱ्या उत्सव साजरा

मा.आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते शुभारंभ

अडावद ता. चोपडा | खान्देश लाईव्ह न्यूज|
जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा भोंगऱ्या बाजार उनपदेव अडावद येथे भरला आहे. लाखाच्या वर यात्रेकरू व शेकडो ढोल पथक आपल्या पाड्या वास्त्यावरील आदिवासी बंधू भगिनीं अबाल वृद्ध उपस्थित होते. ढोलाच्या सुमधुर नाद निनादत होता. त्यात भान हरपून आदिवासी नृत्य करताना दिसत होते. तसेच वर्षभरातून एकदा या बाजारातून अनेक चीज वस्तू खरेदी करीत होते.
१० रोजी दुपारी बारा वाजता शरभंग पाडा येथे भोंगऱ्या उत्सवाचा प्रारंभ माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते भोंगऱ्या देवाची (बोपदेव) पूजा करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी लोकनियुक्त सरपंच भावना पंढरीनाथ माळी, अनिता भिलाला, शरभंग पाड्याचे पोलीस पाटील देवासिंग पावरा, गाव डाया गजीराम पावरा, आदिवासी सेवक संजीव शिरसाठ, शेवरे बुद्रुकचे पोलीस पाटील गणदास बारेला, सचिन महाजन, हरीश पाटील, पत्रकार रफिक मण्यार, पि. आर. माळी, रायसिंग पावरा, मेंबर खुमसिंग बारेला, टुबासिंग पावरा, नरसिंग बारेला, जगन बारेला, भाकीराम बारेला, कनसिंग बारेला, रमेश बारेला, ताराचंद बारेला, कांतीलाल बारेला, लक्कडसिंग बारेला, सत्तरसिंग पावरा , अनिल बारेला, अनिल पावरा, रायसिंग बारेला, गण्या बारेला, पन्नालाल बारेला, पांड्या बारेला, हाससिंग पावरा, रामचंद बारेला, बाटा पावरा, दिलीप बारेला आदींसह आदिवासी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

•लाखोंची झाली उलाढाल
आदिवासी बांधव या उत्सवात नवे कपडे परिधान करून येतात या उत्सवात दाळ्या, फुटाणे, साखरेचे हार, कंगण, जलेबी, फळे, महिलांचे दागिने, असे मोठा प्रमाणावर खरेदी विक्री होते. टॅटू गोंधणारे, फोटो काढणारे, कुल्फीवाले, तसेच इतर शीतपे्यांचे दुकानें मोठ्या प्रमाणावर होती. यात लाखो रुपयांची उलाढाल झाली असल्याचे जाणकार सांगतात.
दुपारी चार नंतर ढोल स्पर्धा भरविण्यात आली. यात शेकडो पथकांनी सहभाग घेतला. यासाठी अकरा हजार रुपयांचे पहिले बक्षीस, पाच हजार रुपयांचे दुसरे बक्षीस आहे तर सहभागी प्रत्येकाला पाचशे रुपये प्रती सहभागी ढोल प्रमाणे आहे. याचे काम उशीरपर्यंत सुरु होते.
चोख पोलीस बंदोबस्त
या भोंगऱ्या बाजारात अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, उपनिरीक्षक राजू थोरात, पोलीस हवालदार भरत नाईक, शेषराव तोरे, गृहरक्षक दलाचे जवान संजय पवार, संजय शेलकर, रामदास महाजन, रामकृष्ण महाजन,प्रदीप माळी, किशोर पाटील, सदानंद पाटील, रमेश पाटील, दिलीप पाटील, गणेश पाटील, दिपक कोळी, संदीप पाटील आदींनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button