संत सावता यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम
जळगाव |
महात्मा फुले बहुउद्देशीय समाज विकास संस्थातर्फे संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. पालखी दिंडी काढून वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात हभप भागवत महाराज यांनी समाज प्रबोधनपर मार्गदर्शन केले.
संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अयोध्या नगर येथील महात्मा फुले बहुउद्देशीय समाज विकास संस्थेतर्फे कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ.सुरेश भोळे, माजी नगरसेवक डॉ. वीरेन खडके, रंजना वानखेडे, सरिता माळी कोल्हे, वसंत महाजन, रामचंद्र थोरात उपस्थित होते.
यानंतर आमदार सुरेश भोळे यांचे हस्ते पूजन करून दिंडी व पालखी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. पालखी सोहळ्यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन संत सावता महाराज यांच्या कार्याला उजाळा दिला. या नंतर हभप भागवत महाराज यांनी समाज प्रबोधनपर मार्गदर्शन करून भाविकांना प्रबोधित केले.
वसंत पाटील यांनी पर्यावरणविषयी मार्गदर्शन केले. ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येईल त्यांनी आपल्या घरासमोर एक झाड लावावे ही प्रतिज्ञा समाजाला देण्यात आली. यानंतर वृक्षारोपण करण्यात आले. भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी उद्योजक संतोष इंगळे, नंदू पाटील, सुनील चौधरी, हेमंत महाजन, जयंत इंगळे, प्रमोद थोरात, वामन महाजन, संदेश महाजन, बापू माळी, सुनील माळी, दौलत माळी, हर्षल इंगळे, महेश महाजन, अक्षय महाजन, पवन इंगळे आदींनी परिश्रम घेतले.