आदिवासी विभाग आणि जैन इरिगेशन आयोजित कृषी प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठ संधी कार्यशाळाचे आयोजन
आदिवासी समाजाच्या आर्थिक उन्नतीस चालना - अशोकभाऊ जैन

जळगांव|खान्देश लाईव्ह न्यूज|
आदिवासी विकास विभाग व जैन इरिगेशन सिस्टिम्स ली च्या वतीने 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात यावल, रावेर, चोपडा तालुक्यातील दुर्गम भागातून १२०० हुन अधिक आदिवासी बांधव उपस्थित होते , आजच्या समारोप प्रसंगी जैन इरिगेशन सिस्टिम्स ली चे अध्यक्ष अशोक भाऊ जैन , जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , जि प च्या नूतन सिइओ मीनल करणवाल, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांचेसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आदिवासी बांधवांनी जैन हिल्स विविध पिकांच्या डेमो प्लॉट ला भेट देऊन माहिती घेतली.
आदिवासी विकास विभागाद्वारे पेसा क्षेत्रातील वैयक्तिक वनहक्क धारक (IFR) यांच्यासाठी सामूहिक योजनांच्या अंमलबजावणीसाठी क्षेत्रनिहाय मसाला समूह तयार करण्यासंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.