राजकारणजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र
छगन भुजबळांच्या उपस्थितीत मेळावा
जळगावात होणारा एल्गार महामेळावा

जळगाव|खान्देश लाईव्ह न्यूज|
अखिल भारतीय
महात्मा फुले समता परिषदेकडून जळगावातील मानराज पार्क मैदानावर शनिवारी (दि. २२) सायंकाळी पाचला एल्गार महामेळावा होणार आहे. मेळाव्यासाठी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार असल्याची माहिती परिषदेचे उपाध्यक्ष बाबासाहेब कर्डक यांनी पत्रकार परिषदेत दिली. जळगावातील पद्मालय विश्रामगृहात आयोजित या पत्रकार परिषदेत ज्ञानेश्वर महाजन, वसंत पाटील, शालिग्राम महाजन आदी उपस्थित होते. या वेळी बाबासाहेब कर्डक यांनी सांगीतले की, जळगावात होणारा एल्गार महामेळावा ओबीसी, भटके विमुक्त, बाराबलुतेदारांसाठी ऐतिहासिक टप्पा ठरेल. समाजाच्या हक्कांसाठी लढा देण्याचा निर्धार करण्यात येणार आहे.