राजकारणजळगावताज्या बातम्या
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी कल्पना पाटील यांची निवड
जळगाव |
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष पदी कल्पना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष बांधणीसाठी विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असून जळगाव राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्षपदी कल्पना पाटील यांची नियुक्ती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर नियुक्ती करण्यात आली आहे.
कल्पना पाटील यांच्या या नियुक्ती बद्दल त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.