राजकारणकरिअरक्रीडाजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

विभागीय व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

जळगाव |खान्देश लाईव्ह न्यूज|
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ आणि जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय व जिल्हास्तरीय क्रीडा जीवन गौरव, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श क्रीडा शिक्षक आणि आदर्श क्रीडा संचालक पुरस्कार सोहळा गोदावरी फाउंडेशनच्या इंजिनिअरिंग कॉलेज सभागृहात उत्साहात पार पडला. यावर्षीपासून आदर्श क्रीडा संचालक पुरस्काराचा समावेश करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, डॉ. दिनेश पाटील (क्रीडा संचालक,बी.चौ.उ.म.वि.), दिनानाथ भामरे (महानगरपालिका क्रीडा अधिकारी), डॉ. प्रदीप तळवलकर (शिवछत्रपती पुरस्कारार्थी), डॉ. अक्षय बाऊस्कर, विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे, के.यू.पाटील, कांचन नारखेडे, प्रा. इकबाल मिर्झा, डॉ. आनंद पवार (धुळे), डॉ. मयुर ठाकरे (नंदुरबार) आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. राज्यगीत व स्वागत गीत संगीत शिक्षक पंकज पाटील यांनी सादर केले. जिल्हा व विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रीडा शिक्षक व मुख्याध्यापकांना शाल, सन्मानपत्र व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

पुरस्कार प्राप्त विजेते :

विभागीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार :
संजय पांडुरंग चव्हाण (नाशिक), संजय लोटनराव पवार (धुळे), फादर जॉय व्हेटोली सी.एम.आय. (धुळे), लक्ष्मण सुका तायडे (जळगाव), चंद्रशेखर रामसिंग पाटील (जळगाव), सुषमा शाह (नंदुरबार), नूतनवर्षा वळवी (नंदुरबार)

विभागीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार :
किशोर गणेश राजगुरू, राजाराम विठोबा पोटे (नाशिक), डॉ. भूपेंद्र मालपुरे, विजय सिसोदे (धुळे), निलेश पाटील, योगेश सोनवणे, प्रविण पाटील (जळगाव), युवराज पाटील, जगदीश बच्छाव (नंदुरबार)

जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार :
समिधा सोवनी (जळगाव शहर), अनिल महाजन (भुसावळ), युवराज पाटील (यावल), अजय महाजन (रावेर), अनिल चव्हाण (मुक्ताईनगर), अमितकुमार पाटील (भडगाव), प्रविण पाटील (जामनेर), गणेश पाटील (पाचोरा), विजय शितोळे (चाळीसगाव), उमेश पाटील (पारोळा), साहेबराव पाटील (एरंडोल), रोहिदास महाले (धरणगाव), अशोक साळुंखे (चोपडा), लिलाधर बाविस्कर (शहर), संजय काटोले (जळगाव तालुका), मुख्तार सय्यद, याकूब शेख (भुसावळ), योगेश पाटील (अमळनेर)

क्रीडा जीवन गौरव पुरस्कार :
प्रशांत राजाराम जगताप

आदर्श क्रीडा संचालक पुरस्कार :
डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर (मु.जे. महाविद्यालय), डॉ. पी.आर. चौधरी (शिरीष चौधरी महाविद्यालय)

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश जाधव यांनी, सूत्रसंचालन डॉ. कांचन विसपुते यांनी व आभार प्रदर्शन डॉ. आनंद पवार यांनी केले. यावेळी सर्व तालुक्यांचे अध्यक्ष व सचिव यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन महाजन, प्रा. हरीश शेळके, डॉ. आसिफ खान, देविदास महाजन, गिरीश पाटील, युवराज माळी आदींनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button