राजकारणचोपडाजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रसंस्था

आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या कडून चोपडा येथे छोट्या व्यावसायिकांना छत्री वाटप

चोपडा | खान्देश लाईव्ह न्यूज |
चोपडा येथे बुधवार दिनांक १६ एप्रिल रोजी छोट्या व्यावसायिकांना छत्री वाटप करण्यात आले. चोपडा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार अण्णासाहेब प्रा‌.चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनात युवा उद्योजक मा. पियुष चौधरी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. शहरात ठिकठिकाणी उदरनिर्वाह करण्यासाठी छोटे व्यवसाय करतात. कधी पाऊस तर कधी उन्हाचा त्यांना सामना करावा लागतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने भाजी, फळ, कपडा विक्रेते यासह फूटपाथवर बसून उदरनिर्वाह करणा-या विक्रेत्यांना छत्री वाटप करण्यात आली. यामुळे या छोट्या विक्रेत्यांना मोठा आधार मिळाला आहे. विक्रेत्यांनी पियुष चौधरी यांचे आभार मानले. यावेळी चोपडा कृऊबा चे सभापती नरेंद्र पाटील,शहर पोलिस स्टेशन चे पीआय मधुकर साळवे,राजेंद्र पाटील बिटवा,किशोर चौधरी,कृउबा संचालक ॲड शिवराज पाटील,गोपाल पाटील,किरण देवराज,सुनिल बरडिया,विपीन जैन,दिव्यांक सावंत,बिलाल शेख,प्रदिप बारी,नंदू गवळी,मोईन कुरेशी,जावेद शेख,योगेश पाटील,अनुप जैन,आबिद शेख,ईलु शेख,सुनिल पाटील,अतुल चौधरी,पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button