भाजपातर्फे 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यभर ‘ हर घर तिरंगा ’ अभियान संयोजक आ. उमा खापरे यांची माहिती.
मुंबई |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 जुलै च्या ‘ मन की बात ’ मध्ये ‘हर घर तिरंगा ’अभियान साजरे करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभरात 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘ हर घर तिरंगा ’ अभियान मोठ्या उत्साहात साजरे करणार असल्याची माहिती ‘हर घर तिरंगा ’ अभियानाच्या प्रदेश संयोजक आ.उमा खापरे यांनी सोमवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी अभियान सह संयोजक राणी निघोट-द्विवेदी, किरण पाटील, अजय भोळे, सुदर्शन पाटसकर उपस्थित होते.
स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक, पुतळा परिसर स्वच्छता कार्यक्रम होणार आहेत. महापुरुष व स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमा पूजनाचे कार्यक्रमही होणार आहेत. 14 ऑगस्ट रोजी फाळणी विभीषिका स्मृति दिनानिमित्त फाळणीमुळे प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ चर्चासत्रे ,संमेलनांचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहितीही आ. खापरे यांनी दिली.