चोपडाक्राईमजळगावताज्या बातम्या

चोपडा येथे अवैध गौणखनिज वाहतुक करीत असतांना जप्त २३ वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री

चोपडा, दि. १५मे २०२५|खान्देश लाईव्ह न्यूज|
चोपडा तालुक्यातील अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक करतांना आढळून आलेली वाहने जप्त करून ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा येथे लावण्यात आलेली आहेत. वाहन मालक यांना अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक केले बाबत दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु संबंधित वाहन मालक यांनी दंडात्मक रकमेचा भरणा न केल्यामुळे जप्त वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. वाहनांवर जमीन महसुलाची थकबाकी समजून उक्त नमुद तरमुदी नुसार जप्त वाहनांचा लिलाव करून लिलावातुन प्राप्त होणारा महसुल शासनास जमा करण्याची कार्यावाही करण्यात येणार आहे. तरी खालील वाहनांची लिलावाची प्रक्रिया तहसिल कार्यालय चोपडा येथे दि. २३ मे २०२५ रोजी करण्यात येणार आहे.
२३वाहने जप्त करण्यात आली असून, यामध्ये ट्रॅक्टर व ट्रॉलींचा समावेश आहे. जप्त वाहनांची यादी, वाहन क्रमांक, चेसिस नंबर, ट्रॉली माहिती तसेच अंदाजित किंमत विभागाने प्रसिद्ध केली आहे. काही महत्त्वाच्या जप्त वाहनांमध्ये MH १८BR १७२९, MH १८ AA ५७ ४७,MH १९ CY ४९९३, MH १९BG १४७५, MH १९AN ३३२९, आदींचा समावेश आहे.
जप्त वाहनांची सुनावणी २३ मे २०२५ रोजी तहसील कार्यालय, चोपडा येथे होणार आहे. लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी लिलावात भाग घेण्याचा अर्ज, लिलाव होणाऱ्या मालमत्तेची हातची किंमत, अनामत रक्कम तसेच लिलावाच्या अटी व शर्ती या करिता चोपडा येथील तहसिल कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन चोपड्याचे तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button