चोपडाजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्व नियोजन सभा संपन्न

चोपडा,१५ मे२०२५|खान्देश लाईव्ह न्यूज|
चोपडा येथे आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्व नियोजन सभा तहसील कार्यालय चोपडा येथे आयोजित करण्यात आली होती. सदरच्या सभेत मा.उपविभागीय कृषी अधिकारी श्री सी.डी. साठे यांनी प्रास्ताविक केले तर श्री आर एम पाटील कृषी अधिकारी यांनी खरीप हंगामाचे नियोजनाचे सादरीकरण केले किरण पाटील यांनी गुणवत्ता नियंत्रण बद्दल माहिती दिली सदरच्या नियोजन सभेत तालुक्यातील शेतकरी, पदाधिकारी व महिला शेतकरी मोठ्यां संख्येने सहभागी झाले होते तसेच मा.तहसीलदार भाऊसाहेब थोरात मा.गटविकास अधिकारी अनिल विसावे, नायब तहसीलदार योगेश पाटील, सचिन बांबळे व तालुक्यातील विविध विभागाचे प्रमुख उपस्थितीत होते. माननीय आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कापसाची लागवड जुन महिन्यात करण्याचे तसेच अधिकृत विक्रेत्याकडून व कंपनीकडून शासकीय दरात बियाणे खरेदी करण्याचे आवाहन केले. पावसाचे कमी जास्त प्रमाण पाहता पडणारा पाऊस शेतात थांबवण्यासाठी शेताच्या बाजूने बांध राखण्याचे मार्गदर्शन केले. तसेच रासायनिक खते व कीटकनाशके यांचा अतिरिक्त वापर टाळावा असे आवाहन केले.
तसेच कृषि विभागाकडून विविध योजनांतून देण्यात आलेल्या अनुदान प्रातिनिधिक स्वरूपात आ. प्रा. चंद्रकात सोनवणे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहायक श्री के एच महाजन व आभार प्रदर्शन कृषी पर्यवेक्षक श्री जे.व्ही. सनेर यांनी केले सदर नियोजन सभा यशस्वीतेसाठी तालुका कृषी अधिकारी चोपडा कार्यालयांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास श्री नरेंद्र भाऊ पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा, शिवराज पाटील,नामदेव पाटील, प्रताप अण्णा पाटील ,मेहमुद बागवान,कुणाल पाटील, कैलास बाविस्कर, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button