स्वाध्याय भवन येथे मासक्षमण तपस्यार्थी प्रेरणा चोरडिया आणि लीलाबाई बोरा यांचा वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे हृद्य सत्कार
जळगाव |
शहरातील जैन (चोरडिया) परिवारातील स्नुषा प्रेरणा रोहित चोरडिया आणि बोरा परिवारातील लीलाबाई रानुलालजी बोरा यांच्या मासक्षमणची पचकावणी स्वाध्याय भवनात प.पू. शासनदीपक सुमित मुनिजी महाराज आदिठाणा ३ यांच्या पवित्र सान्निध्यात झाली. या निमित्ताने श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगावच्यावतीने तपस्वींचा हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी संघाध्यक्ष दलीचंद जैन, ईश्वरबाबु जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, चातुर्मास समिती प्रमुख राजेंद्र लुंकड उपस्थित होते.
परमपुज्य सुमित मुनी यांच्या सकाळच्या प्रवचनानंतर तपस्या करणाऱ्यांना अनुमोदन करण्यासाठी कार्यक्रम आयोजला होता. आरंभी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगावचे मंत्री अनिल कोठारी यांनी दोन्ही तपस्या करणाऱ्या भगिनींबाबत उपस्थितांना तपश्चर्येबाबत माहिती दिली. सचिन बोरा आणि दिलीप गांधी यांनी तपस्या करणाऱ्या भगिनींना देण्यात आलेल्या अभिवादन पत्राचे वाचन केले. दलीचंद जैन, ईश्वरलाल जैन, अशोक जैन इत्यादी मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात येऊन त्यांना अभिवादन पत्र प्रदान केले गेले. तपस्या करणाऱ्या भगिनींच्या परिवाराच्या सदस्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी जळगाव शहरातील तसेच बाहेरगावहून आलेले, मान्यवर श्रावक आणि श्राविका उपस्थित होते.