महाराष्ट्रजळगावताज्या बातम्या

महामंडळाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी मांडल्या विविध समस्या

जळगाव |
यावर्षी अनेक गणेशमंडळांच्या मुर्त्या उंच आहे. शहरातील अनेक भागात रस्ते तयार झाल्याने त्याची उंची वाढलेली आहे. त्यामुळे गणेश मुर्ती नेतांना लोंबकणाऱ्या विद्युत तारांसह झाडांची छाटणी करण्यासह अनेक समस्या गणेश मंडळांनी काल बैठकीत मांडल्या. यावेळी प्रशासनासोबत समन्वय साधून गणेश मंडळांच्या समस्या तात्काळ मार्गी लावणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या बैठकीत देण्यात आले.
यंदाचा श्री गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून त्या पार्श्वभूमीवर दि. १० रोजी विसनजी नगरातील गायत्री मंदिरात महामंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील विविध मंडळांनी उत्सवासाठीचे केलेले नियोजन यावर चर्चा करण्यात आली. तसेच मंडळांना श्री. स्थापना संदर्भात येणाऱ्या अडचणी या बाबतीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने श्री. उत्सवादरम्यान शहरातील साफसफाई, श्री. दधिची चौक बालाजी पेठ येथील रस्त्यावर तयार केलेल्या नवीन ढाप्याची उंची श्रीची मुर्ती मार्गक्रमण करणस अडचण निर्माण होणार असून त्याच्या तक्रारी या बैठकीत कार्यकत्यांनी मांडल्या. यावेळी महामंडळाचे जेष्ठ सदस्य दिपक जोशी, समन्वयक सूरज दायमा,
नितीन चौधरी, नितीन सनकत, धीरज पुरोहित, पियुष मंधवाणी, निखिल कटपाल, लवीन शिव, श्रीकांत शिखवाल, मोहित सिखवाल, भरत सैयाणे, मोहित नेमाडे, प्रीतम शिंदे, सागर चौबे, अर्जुन गुजर, विपूल पाटील, मयूर शिंपी, अथर्व ठाकरे, राहुल घोरपडे, चेतन सोनवणे, भूषण सपकाळे, शंतनू सपकाळे, विजय सारस्वत, गौरव क्षीरसागर, जयेश सोनवणे, दीपक सोनवणे, प्रकाश गवळी, अतुल शिरसाळे, आकाश जाधव, पवन शिके, आकाश फडे यांच्यासह जळगांव शहरातील विविध श्री गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशमुख, राजू मराठे, अश्विन भोळे, मुनेश बारी, राहुल परकाळे, राकेश तिवारी, दीपक वाभाडे, धनंजय चौधरी, भूषण शिंपी, चेतन पाटील, गोपाल रामावत, अमोल धांडे, सागर चौधरी, पंकज मोमाया, विक्की भोईटे, विनोद अनपट, सुजय चौधरी, साई सराफ, अरुण श्रीखंडे, दिपक श्रीखंडे, विकास चौधरी, नीरज पाटील, विनायक पाटील, दिपक नाझरकर, चेतन नाथजोगी, बापू गवळी, भूषण गवळी, विष्णू गवळी, हषीकेश पाटील, सुनील पवार, मनोज सपकाळे, अक्षय कोळी, ललित सोनवणे, अश्विन शंकपाळ, धीरज सपकाळे, जितेंद्र सोनवणे, कल्पेश तीलकपुरे,
शहरातील छत्रपती शिवाजी नगर भागातील स्मशानभूमी रस्त्यावर पडलेला मोठा बुजविणे, त्यासोबतच परवानगी घेताना महावितरण तर्फे घेतली जाणारी डिपॉझिट ची रक्कम परतावा विषयी येणाऱ्या अडचणी या समस्या मांडण्यात आल्या. तसेच महामंडळाची कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी प्रत्येक मंडळाने प्रत्येकी 2 सदस्य हे महामंडळासोबत द्यावे जेणेकरून संपर्क लवकर होऊन प्रश्न लवकर निकाली लागतील असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने सर्व मंडळांना करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button