आर्ट गॅलरीसाठी पाठपुरावा करणार – डॉ. उल्हास पाटील
जळगाव |
शहरात आर्ट गॅलरी निर्माण होण्याकामी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी फोटोग्राफर बांधवांना आश्वासन दिले. जागतिक – छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर असोसिएशन जळगाव, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
पुतळ्याजवळ कॅमेरा पूजन झाले. त्यावेळी डॉ. पाटील बोलत होते.
प्रमुख पाहुणे माजी आमदार मनीष जैन, माजी नगराध्यक्ष चतुर्भुज सोनवणे, माजी महापौर विष्णू भंगाळे, सीमा भोळे, प्रेस फोटोग्राफर असोसिएशन आमंत्रित सदस्या सरिता माळी-कोल्हे, अनिल जोशी, माजी उपमहापौर करीम सालार, अश्विन सोनवणे, गोपाळ दर्जी, युसूफ मकरा, माजी नगरसेवक विशाल त्रिपाठी, कैलास सोनवणे, सुनील माळी, अशोक लाडवंजारी, वाल्मीक पाटील,
अॅड. जमील देशपांडे, इरफान नुरी, सहायक पोलिस निरीक्षक मोरे, जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविक फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष शब्बीर सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन युवराज वाघ यांनी केले. आभार सतीश जगताप यांनी मानले.
वैभव धर्माधिकारी, जयंत पाटील, राजू हारीमकर, अतुल वडनेरे, बंटी सय्यद, विशाल महाजन, प्रियंक शहा यांनी सहकार्य केले.