महाराष्ट्रजळगावताज्या बातम्या

मराठी प्रतिष्ठानतर्फे पिंक रिक्षा योजना सुरू

जळगाव |
मराठी प्रतिष्ठान लोकसभागातून शहरांमधील लाडक्या बहिणींकरता लाडकी पिंक रिक्षा योजनेला सुरुवात करत असून जळगांव शहरातील गरजू वीस महिलांची निवड केली जाणार असल्याची माहिती मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जमील देशपांडे यांनी दिली आहे.
मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जळगाव शहरांमध्ये महिला सबलीकरण उद्दिष्ट ठेवून शहरांमधील विधवा, परितक्त्या गरजू भगिनींनी शहरामध्ये रिक्षा चालवून आपलं आर्थिक जीवनमान सक्षम करावं या हेतूने पिंक आटो ची सुरुवात करण्यात आली होती. पाच पिंक शहरात प्रथम सुरू करण्यात आल्या होत्या आता बावीस भगिनी जळगाव शहरांमध्ये पिंक आटो चालवत आहे.
शहरामधील अनेक महिला पिंक आटो चालवण्याकरता उत्सुक असून दररोज मराठी प्रतिष्ठानला संपर्क करत आहे. पिंक ऑटो चालवण्याकरता शहरातील महिलांचा कल बघता मराठी प्रतिष्ठानने पुन्हा वीस महिलांना विनामूल्य प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला असून ,त्या अनुषंगाने दिनांक १सप्टेंबर पासून १५ सप्टेंबर पर्यंत नाव नोंदणी करण्यात येणार आहे.
निवड झालेल्या महिलांना विनामूल्य रिक्षा प्रशिक्षण आणि शासकीय दरामध्ये, लायसन्स, बॅच कच्चे परमिट, पक्के परमिट व राष्ट्रीयकृत बँकांकडून अर्थसहाय्य करून दिले जाणार आहे. गरजू महिलांनी मराठी प्रतिष्ठानच्या गणपती नगर कार्यालयामध्ये संपर्क साधावा अशी विनंती मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जमील देशपांडे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button